सत्ता असो किंवा नसो. शरद पवार या नावाला एक वलय आहे. सर्वांत तरुण वयाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून लौकिक असलेला हा जनमानसातला नेता पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणाच्या क्षेत्रात आहे. या काळात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवनाचा प्रारंभ केलेल्या या लोकनेत्याने केवळ राजकारणासाठी राजकारण कधीच केले नाही. शक्य असेल तेथे आणि तेवढे मित्र त्यांनी आपल्या कारकिर्दीत जमविले. समाजकारण करताना सत्तेत असताना आणि नसतानाही त्यांनी कधी पक्षापुरता विचार केला नाही. त्यामुळेच सर्वच पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या आयुष्याची ही सर्वांत मोठी ठेव आहे.
सदैव लोकहिताचा विचार करणार्या पवार साहेबांना म्हणून तर लोक देवासमान मानतात. पवारसाहेबांच्या जडणघडणीच्या काळात आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी हे मित्र कसे जोडले आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री कशी अबाधित ठेवली, मैत्री कशी करावी आणि कशी जपावी, स्नेह वृद्धिंगत कसा करावा, याचा वस्तुपाठ देणार्या अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. त्याची छोटीशी झलक म्हणून सखे आणि सोबती ही विशेष लेखमाला प्रसिद्ध करीत आहोत.
या लेखमालेच्या निमित्तानं समाजमाध्यमातील लेखक घनश्याम केळकर यांनी पवारसाहेबांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम केलेल्या अनेक मान्यवरांचा आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये शिवाजीराव खटकाळे, शिवाजीअण्णा भोसले, पोपट गुरुजी जगताप, भिवा शेलार, बी. जी. काकडे, जवाहरशेठ वाघोलीकर, जगन्नाथअण्णा कोकरे, जमा मोरे, खुशालभाऊ छाजेड, केशवराव जगताप, आनंदराव भोसले, नथुरामअण्णा गीते आणि कामा आगवणे अशा मान्यवरांचा लेखाजोखा या मालिकेच्या निमित्तानं आम्ही आपल्यासमोर आणत आहोत..
तेव्हा महान्यूज लाईव्ह हे वेबपोर्टल आवर्जून वाचा.. सबस्क्राईब करुन सतत रहा अपडेट..! http://www.mahanews.live











खरच भारी माणूस वास्तव वादी आणि हुशार तल्लख बुद्धीचा
नेता असावा तर असा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र आणि देशाचा चा जडणघडणीत मोलाचा वाटा