• Contact us
  • About us
Sunday, May 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कलिंगड निर्दोष, पण शेतकरी दोषी ठरला? पायधुनी प्रकरणानंतर अफवांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका!

tdadmin by tdadmin
May 3, 2026
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
मुंबईत काळजाचा थरकाप: बिर्याणी आणि कलिंगड खाणे बेतले जीवावर? एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

ज्ञानेश्वर रायते, बारामती
मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कलिंगडावर संशयाची सावली पडली आणि काही दिवसांतच बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मुंबईत तब्बल 20 ट्रक कलिंगडे विक्रीअभावी पडून राहिल्याची स्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले. दुर्दैवाची गंमत म्हणजे मात्र आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अहवालाने या सगळ्या चर्चेला पूर्णविराम दिला.

एफडीएच्या तपासणीत डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त केलेल्या कलिंगडात कोणतीही भेसळ आढळलेली नाही. कलिंगडाचा रंग, गोडवा किंवा आकार वाढवण्यासाठी कोणतेही रसायन किंवा कृत्रिम घटक वापरले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय बिर्याणी, पाणी, भात, चिकन, खजूर आणि मसाले अशा इतर खाद्य नमुन्यांमध्येही भेसळ आढळली नसल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

त्यामुळे या मृत्यूंचं कारण कलिंगड नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून आता फॉरेन्सिक आणि बॅक्टेरियल तपासणीच्या अहवालाकडे लक्ष लागलं आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे अफवांचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. कोणताही ठोस पुरावा नसताना कलिंगडावर संशय घेतला गेला आणि बाजारात त्याची मागणी कोसळली. ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. शेतात घाम गाळून पिकवलेलं उत्पादन एका क्षणात ‘संशयित’ ठरलं.

प्रत्येक वेळी अशाच प्रकारे अफवा आणि अर्धवट माहितीमुळे शेतीमाल बदनाम होतो, बाजार ढासळतो आणि नुकसान शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं. नंतर सत्य समोर आलं तरी त्या नुकसानीची भरपाई कुणीच करत नाही. शेतकरी पुन्हा नव्याने उभा राहतो, पण त्याच्या जखमा कायम राहतात.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी आणि समाजाने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. कोणत्याही घटनेचं पूर्ण सत्य समोर येण्याआधीच ‘मीडिया ट्रायल’ केल्याने केवळ एका उत्पादनाची नाही, तर हजारो कुटुंबांच्या उपजीविकेची हानी होते. पायधुनी प्रकरणाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की, कलिंगड निर्दोष ठरलं, पण शेतकरी मात्र पुन्हा एकदा बळी ठरला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group