• Contact us
  • About us
Sunday, April 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दैवी शक्तीचा बनाव आणि श्रद्धेचा बाजार; संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडदे उर्फ ‘दत्तधाम सरकार’ अखेर जेरबंद

tdadmin by tdadmin
April 18, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

संगमनेर : महान्यूज लाईव्ह

मंत्रोच्चाराच्या सुरात दुर्धर आजार पळवून लावण्याचा दावा करणारा आणि स्वतःला ‘दत्तधाम सरकार’ म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र गडगे याच्या भोंदूगिरीचा बाजार अखेर गुंडाळला गेला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे श्रद्धेच्या नावाखाली निष्पाप लोकांची फसवणूक करणाऱ्या या भोंदू बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे.

​गेल्या १० वर्षांपासून राजेंद्र बापू गडगे याने या परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून लोकांमध्ये दहशत आणि श्रद्धा यांचे एक अजब जाळे विणले होते. केवळ दरबारापुरते मर्यादित न राहता, त्याने सोशल मीडियाचा वापर करत ‘दत्तधाम सरकार’ नावाचे युट्यूब चॅनल सुरू केले. या माध्यमातून तो कॅन्सरसारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचे आणि वंध्यत्वावर उपाय करण्याचे खोटे दावे करत असे. संकटात सापडलेला सामान्य माणूस या आमिषाला बळी पडत होता आणि तिथेच त्याच्या लुटीला सुरुवात होत होती.

​तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. संकटांचे निवारण करण्यासाठी हा भोंदू भक्तांकडून १५ हजारांपासून ५१ हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असे. इतकेच नाही, तर उपचाराच्या नावाखाली जंगलातील पालापाचोळा औषध म्हणून देऊन तो रुग्णांच्या आयुष्याशी खेळत होता. गेल्या दशकभरात शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा प्राथमिक ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

​अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत पोलिसांत फिर्याद दिली. या तक्रारीची दखल घेत संगमनेर तालुका पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत राजेंद्र गडगेसह मधुकर शिंदे याला अटक केली. या प्रकरणात गडगेची मुलगी ज्ञानेश्वरी, डॉ. मोहन पुरी आणि सुरज शिंदे अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

​बनावट व्हिडिओ तयार करून लोकांची दिशाभूल करणे आणि वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणे, अशा अनेक गंभीर बाबी पोलिसांनी निदर्शनास आणल्या आहेत. त्यामुळेच आरोपींवर जादूटोणा विरोधी कायद्यासह आयटी ॲक्ट आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टमधील कडक कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group