शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी माजी आमदारांचा महावितरण कार्यालयात फाशी घेण्याचा प्रयत्न

अमोल होरणे : महान्यूज लाईव्ह

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रामध्ये सध्या महावितरण प्रशासनाकडून थकीत वीज बिल प्रकरणी सक्तीची वसुली सुरू आहे.नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सरास शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी मुरकुटे यांनी केली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी या मागणीला केराची टोपली दाखवल्याने संतप्त झालेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयातच शेतकऱ्यांच्या वीज तोड प्रकरणी गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी थांबविले. त्यांच्याबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे ही उपस्थित होते. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago