शिरूर तालुक्यातील दरोडा व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद

शिरूर : महान्युज लाईव्ह

शिरूर तालुक्यातील पाबळ येथील दरोडा व खून प्रकरणातील आरोपीस लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १ मे २०२१ रोजी जमदाडे मळा, पिंपळ वाडीरोड, पाबळ येथे दरोडा घालून तुळसाबाई पार्वती जाधव यांची मुलगी शकुंतला शिंदे हिचा खून करण्यात आला होता.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे हे वाढत्या चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना, पेरणे डोंगरगाव रोड वर दोन व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन शिवा नाना जगताप(रा.केडगाव मार्केटच्या मागे, ता.दौंड) व दिनेश कुंदन पवार (रा.गणपती माळ, तळेगांव ढमढेरे) यांस ताब्यात घेतले.अटक करून पोलिस कोठडीत अधिक चौकशी केली असता,आरोपींनी लोणीकंद पोलिस स्टेशन परिसरात ५ डीपी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींकडून १लाख ,८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.सदर चोरीचा माल घेणारा विरम दिपाराम चौधरी यास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांनी तपासात अधिक माहिती घेतली असता,आरोपी दिनेश पवार याने व त्याच्या चार साथीदारांनी दि.१मे २०२१ रोजी जमदाडे मळा पाबळ येथे दरोडा टाकून मुलीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सदर चा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार,पोलिस निरीक्षक राजेश तटकरे,सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार,पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे,सहायक फौजदार मोहन वाळके,पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे,अंमलदार विनायक साळवे, कैलास साळुंके,अजित फरांदे,समीर पिलाने,बाळासाहेब तनपुरे,पांडुरंग माने,सागर शेडगे यांनी केली आहे.

Maha News Live

Recent Posts