बारामती लोकसभा मतदारसंघात घरी जाऊन घेतलं जातंय मतदान! दौंडमध्ये ३९ घरी जाऊन अधिकाऱ्यांनी करून घेतले गृह मतदान !

दौंड, महान्यूज लाईव्ह

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत गृह मतदानाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे . दौंड निवडणूक विभागाकडुन तालुक्यात मागील दोन दिवस मतदान घेण्यात आले. दोन दिवसांत ३९ मतदारांनी घरी मतदान केले. ही माहिती दौंड तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तहसील कार्यालयाकडुन मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी सहभागी होण्यासाठी तालुक्यात अनेक गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जनजागृती केली गेली आहे. सातत्याने विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृह मतदान प्रक्रिया पार पडली.

१ मे पासून निवडणूक कर्मचारी घरोघरी जाऊन गृह मतदान घेत आहेत. तीन दिवसांचा हा कार्यक्रम असून मागील दोन दिवसांत ५८ पैकी ३९ मतदारांना घरी मतदान करण्याची संधी मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान प्रक्रियेचा हा नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. यामध्ये काही वृध्द, दिव्यांग आणि मतदान बूथवरती मत देण्यासाठी जाता येत नाही अशा मतदारांसाठी गृह मतदान नावाने कार्यक्रम राबविला जात आहे.

तालुक्यात या गृहमतदान प्रक्रियेसाठी घरोघरी जाऊन मतदान घेण्याच्या या पद्धतीला बूथवर ज्या पद्धतीने मतदान घेतले जाते, तशीच सर्व यंत्रणेचा वापर केला जाते. त्यामुळे गुप्त मतदान प्रक्रियेला धक्का लागला जात नाही. असा दावा दौंड निवडणूक विभाकाडून केला जात आहे. तालुका निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार, नोडल निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे, दोन मतदान कर्मचाऱ्यांची पथके, व्हिडिओ ग्राफर, पोलीस कर्मचारी यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.

tdadmin

Recent Posts