बारामती : तालुक्यातील बाबुर्डी गावात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत तीन 🏡 घरं फोडली; 🗡️ चाकूचा धाक दाखवून ३ लाखांचे सोन्याचे दागिने लुटले!

बारामती : महान्यूज लाईव्ह

कोरोना आणि त्यानंतरच्या मंदीचा सामना करावा लागलेल्या कुटुबांपुढे अनेक समस्या असतानाच आता चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. आज (ता. २१) पहाटे बाबुर्डीत चोरट्यांनी धुडगूस घातला. 3 घरांची घरफोडी करत सुऱ्याचा धाक दाखवून 6 तोळे सोने अन रोख साडेसहा हजारांची चोरी केली.

बाबुर्डी येथील माणिक बाचकर यांच्या घरातील कपाटातील मंगळसूत्र, कानातील रिंगा, पायातील पट्ट्या असे 4 तोळ्यांचे दागिने आणि रोख साडेसहा हजार रुपये, माणिक बाचकर यांच्या शेजारील सुमन बाचकर यांचे मंगळसूत्र आणि कानातील 2 तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

गावातील शेखर बाचकर यांच्या घरातील कपाटातील समान अस्ताव्यस्त टाकून दिले पण तिथे त्यांच्या हाताला काही लागले नाही. मात्र सुमन बाचकर यांच्या गळ्याला सुरा लावून ‘गप्प बस नाही तर, डोक्यात सुरा घालून जाग्यावरच खल्लास करून टाकीन’ असा दम देत गळ्यातील मंगळसूत्र अन कानातील दागिने अन मोबाईल काढून घेतले. हा दरोडा टाकताना चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या होत्या.

शांत असणाऱ्या जिरायती भागातील बाबुर्डीत झालेल्या या प्रकारामुळे नागरीक हादरले आहेत.

पोलिसांची तत्परता; ग्रामस्थांना दिलासा

यावेळी पहाटे बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे आणि पोलीस पाटील वनिता लव्हे यांनी सुपा पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री. सलिम शेख यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मात्र पहाटेच्या वेळी काही क्षणातच फौजदार सलिम शेख आणि हवालदार श्री. माहुरकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन गावाच्या शेजारी आजूबाजुला राहणाऱ्या संशयितांच्या वस्तीवर जाऊन तातडीने तपास सुरू केला.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

16 hours ago