लोणार पोलीसांची जुगार अड्ड्यावर कारवाई! पाऊण लाखांच्या मुद्देमालासह १० आरोपी ताब्यात!

संदीप मापारी पाटील, बुलढाणा

लोणार पोलीसांनी येवती येथील शेतात खुल्या जागेवर चालणा-या जुगारावर आज (ता. २०/०८/२०२१) रोजी पहाटे १.३० च्या दरम्यान धाड टाकत दोन मोटर सायकलसहीत ७४३० रोख रकमेसह ७२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल व दहा आरोपी ताब्यात घेत धडाकेबाज कामगिरी केली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील येवती येथे शेता मध्ये मोकळया जागेवर खुलेआम जुगार खेळ चालु असल्याची गोपनीय माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शरद आहेर, पोकॉ रविंद्र बोर, गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण, कृष्णा निकम, केशव बोरे, गणेश पामस्कर, गजानन ठाकरे यांच्या पथकाला पाचारण केले.

यांनी सुचना देत सदर ठिकाणी धाड टाकण्याचे सांगितले. लोणार पोलीसांनी येवती येथील गावालगतच्या शामराव गायकवाड यांचे शेतातील गोठ्यासमोरील मोकळया जागेत जाऊन पाहणी केली असता, तेथे काही जण जुगाराची पध्दत हारजीत खेळतांना आढळून आले.

पोलीसांनी धाड टाकल्यानंतर काही जण अंधाराचा फायदा घेत पळाले. मात्र पोलीसांनी त्यांचा पाठलाग करत पकडून आणले. यामध्ये शामराव आयाजी गायवाकड, सत्यनारायण संपत शिंदे, श्रीकिसन रतन जाधव, रामेश्वर आयाजी सोनुने, ज्ञानेश्वर पिराजी पवार, गणेश शेषराव गायकवाड, राजु प्रल्हाद कायदे, सुधाकर शंकर चव्हाण, रामेश्श्वर मल्हारी सानप, सतोष अंबादास कांगणे (सर्व रा.येवती) यांचा समावेश होता.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर कलम १२ (अ) मुंबई जुगार कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्यामुळे चोरुन जुगार खेळणारांचे धाबे दणाणले. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक शरद आहेर, रविंद्र बोरे, कृष्णा निकम करीत आहेत.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

4 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

8 hours ago