जे काम सराईत गुंड करायचे; ते आता पोलीस करू लागलेत! प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा!

नागपूर : महान्यूज लाईव्ह

घटना गृहमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातील. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रिंग रोडवर बंद कारमधून विवाहित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गाठले. आणि विवाहित महिलेलाच संसार उध्वस्त होण्याची धमकी देत दोघांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून तीन तोळे सोन्याची साखळी हिसकावून नेली. संबंधित युवकाने तक्रार दाखल केल्याने पोलिसांची बिंग फुटले आणि नागपूर जिल्ह्यातल्या पोलिसांची अब्रू गेली.

यासंदर्भातील थोडक्यात माहिती अशी की वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर रिंग रोडवर नागपुरातील गणेशपेठ मधील एक युवक एका विवाहित महिलेला घेऊन या रिंग रोडवर गेला. एका हॉटेलच्या बाजूला त्याने गाडी नेऊन बंद केली व तेथे या महिलेशी अश्लील चाळे करू लागला.

यादरम्यान दोन पोलीस कर्मचारी गस्त घालण्याच्या उद्देशाने फिरत होते. त्यांना एका कारमध्ये दोघेजण दिसून आले. त्यांनी कारजवळ जाऊन दोघांना बाहेर काढले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर महिलेच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यामध्ये आणून सर्व माहिती देऊ असे सांगताच संबंधित महिला गयावया करू लागली.

त्यावरून या दोघांनी पैसे मागितले. मात्र पैसे नसल्याने त्यांनी युवकाची सोनसाखळीची मागणी केली व कोणाला सांगितले, तर पोलीस ठाण्यात संपूर्ण कुटुंबाला बोलवू आणि सगळी माहिती देऊ अशी धमकी दिली. यानंतर युवकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली आणि दोघांना सोडून दिले. मात्र ही घटना घडताच संबंधित युवकाने महिलेला तिच्या घरी सोडले आणि वाठोडा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी त्याचा तपास केला. पंकज जाधव व संदीप यादव अशा दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लुटमारीच्या घटनेत पोलिसांनी निष्पन्न केले आणि दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

tdadmin

Recent Posts