जय हो निवडणूक आयोग! बारामती लोकसभा मतदारसंघात आणखी एका उमेदवाराला तुतारीचा चिन्ह सुप्रिया सुळे यांनी घेतला आक्षेप!

बारामती : महान्यूज लाईव्ह

उद्धव ठाकरे यांना मशाल गीतामधील जय भवानी हे शब्द काढून टाकण्याची सूचना निवडणूक आयोगाने केल्यानंतर आता आणखी एक वादग्रस्त मुद्दा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेपित केला आहे. बारामती मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला उमेदवाराला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले असताना दोन उमेदवारांना तुतारी हे चिन्ह दिल्याने सुप्रिया सुळे यांनी मतदारांचा गोंधळ होऊ शकतो अशा मुद्द्यावरून निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोहेल शेख या उमेदवाराला ट्रंपेट म्हणजेच तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाला सुप्रिया सुळे यांनी हरकत घेतली आहे.

सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली असून या पक्षाचे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे आहे. आता अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह दिले गेल्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो असं सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी ट्रंपेट या चिन्हाच्या खाली त्याचा मराठी अनुवाद तुतारी असा लिहिला आहे यातील चिन्हासाठी आक्षेप नाही मात्र मराठी तुतारी हा शब्द बदलून त्या ऐवजी दुसरा शब्द निवडणूक आयोगाने द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

दरम्यान ज्या अपक्ष उमेदवाराला हे तुतारी चिन्ह मिळाले आहे तो सोहेल शेख मूळचा बीडचा आहे. त्याने बारामती लोकसभा मतदारसंघात हा अर्ज भरला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार मैदानात आहेत. मात्र प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात होत आहे. आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

tdadmin

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

11 hours ago