नीरा भीमा कारखान्यावर शनिवारी शहाजी केसरी! कुस्तीचे जंगी मैदान..!

पै.सिकंदर शेख व पै. प्रीतपाल फगवारा (पंजाब) यांच्या कुस्ती लढतीकडे राज्याचे लक्ष !

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या ‘शहाजी आखाडा’ या कुस्ती मैदानावर शनिवारी (दि.25) शहाजी केसरी कुस्ती आखाडा भरणार आहे. कुस्ती मैदानावर राज्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या होणार असून कुस्ती शौकीनांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

कुस्ती आखाड्यामध्ये शहाजी केसरी किताबासाठी कुस्ती सध्या राज्यात गाजत असलेला महान भारत केसरी पै.सिकंदर शेख विरुद्ध देशातील नामांकित मल्ल पंजाब केसरी पै.प्रीतपाल फगवारा (पंजाब) यांच्या मध्ये होणार असून, या लक्षवेधी लढतीकडे महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुस्ती मैदानावर दुपारी दोन वाजता या कुस्त्यांना प्रारंभ होणार असून याचे संपूर्ण नियोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक , निरा भिमा साखर कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

तसेच यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन पै.हर्षद ( माऊली) कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै.हर्षवर्धन सदगीर, पै.महारुद्र काळेल विरुद्ध पै.शुभम सिदनाळे, पै.दादा मुलाणी विरुद्ध पै.वैभव माने, पै.कालिचरण सोलनकर विरुद्ध पै.आशिष वावरे, पै.मामा तरंगे विरुद्ध पै.मनीष रायते, पै. नामदेव कोकाटे विरुद्ध अमित सूळ आदी अनेक नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्या होणार आहेत अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

कुस्ती ही महाराष्ट्राची शान असून, कुस्ती परंपरेचे जतन व्हावे व कुस्तीगिरांना प्रोत्साहन मिळावे, याहेतूने आता प्रत्येक वर्षी कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी दि.25 फेब्रुवारीला शहाजी कुस्ती केसरी आखाड्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तरी शहाजी केसरी कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहणेसाठी इंदापूर तालुक्यातील व परिसरातील नागरिक, कुस्तीगीर, कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील,ॲड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के,दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर,भागवत गोरे, चंद्रकांत भोसले,संगीता पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago