तो रस्त्याच्या मधूनच गाडी चालवत होता.. एसटी चालकाने फक्त हॉर्न वाजवला.. अन त्याची सटकली.. एसटी चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली..!

निमगाव केतकीतील घटनेने एसटी चालकांमध्ये खळबळ..! रस्त्याच्या मधून चाललेल्या दुचाकी ला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवला म्हणून मोटारसायकल स्वाराचे कृत्य..!

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : रस्त्याच्या मधूनच मोटारसायकलवरून निघालेल्या इसमास बाजूला होण्यासाठी एसटी चालकाने हॉर्न वाजवला.. या गोष्टीचा राग येवून मोटरसायकल स्वाराने एसटी जवळ येऊन शिवीगाळ करत एसटी चालकाच्या गचांडीला धरून एसटीमधून खाली ओढत दुसऱ्या हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना निमगाव केतकी येथील इरिगेशन बंगला येथे घडली.

मारहाणीचा प्रकार एसटीचे वाहक व एसटीमधील प्रवाशांनी वेळीच रोखला. या घटनेमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत दौलत इनायत देशमुख (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांनी अज्ञात मोटरसायकल स्वाराच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी (दिनांक 3) रोजी बारामती इंदापूर अशी प्रवासी घेऊन इंदापूरकडे निघालेली एसटी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकीच्या रामकुंड रस्त्याजवळ आली असता एसटीसमोर रस्त्याच्या मधोमध चाललेल्या मोटरसायकल स्वारास हॉर्न दिला. त्यानंतर सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकीच्या बसस्थानक परिसरात प्रवासी गाडीत घेण्यासाठी एसटी थांबली.

तेव्हा त्या मोटरसायकल वरील अनोळखी इसमाने मोटर सायकल वरून येऊन माझ्या गाडीला हॉर्न का वाजवला म्हणत शिवीगाळ केली. त्यावेळी एसटी ड्रायव्हरने हॉर्न दिला म्हणून काय झाले? असे म्हणताच दुचाकीस्वाराने ड्रायव्हरच्या सीटवरून एसटी चालकास एका हाताने माझ्या गळ्याला धरून खाली ओढत दुसऱ्या हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी एसटीमध्ये असणारे वाहक महेश शिवदास यादव तसेच एसटी मधील प्रवाशांनी मारहाण करणार्‍या इसमास बाजूला ओढले. त्यानंतर घडलेला प्रकार एसटी खात्यांच्या अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात संबंधित घडलेल्या घटनेची तक्रार एसटी ड्रायव्हर दौलत देशमुख यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिली. इंदापूर पोलिसांनी अज्ञात मोटरसायकल स्वराच्या विरोधात भादवि कलम 353,323,504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

3 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

4 days ago