राजकीय

राज्यसभा होणार बिनविरोध ! सहा जागांसाठी सहाच उमेदवार !

मुंबई : महान्यूज लाईव्ह

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपाने या निवडणूकीसाठी दोनच उमेदवार जाहीर केले आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपाकडे काही मते शिल्लक असतानाही हा निर्णय घेतला गेला आहे.

इतर पक्षांनीही आपल्या कोट्यानूसार उमेदवार जाहीर केल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी सुरुवातीला दावा केला होता. परंतू नंतर त्यांनी या निवडणूकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी दिली.

आता भाजपाकडून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व अनील बोंडे तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे उमेदवार जाहीर झाले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत.

tdadmin

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

4 hours ago