सामाजिक

आनंदाची बातमी ! बेपत्ता विमान सापडले ! सर्व प्रवासी सुखरूप ! मुंबईचे चार जण होते विमानात !

मुंबई : महान्यूज लाईव्ह

नेपाळमधील खाजगी एअरलाईन्सचे एक छोटेखानी विमान सकाळी १० वाजता पोखराहून निघाले होते. केवळ १५ मिनिटाचा या विमानाचा प्रवास होता. पण उड्डाण झाल्यानंतर हे विमान अचानक बेपत्ता झाल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. मात्र सहा तासांच्या शोधानंतर ते विमान सापडले असून विमानातील सर्व २२ प्रवासी सुखरुप आहेत. या विमानात असलेले ४ भारतीय हे मुंबईचे होते.

नेपाळच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान हिमालयाच्या मानापाथीच्या खालच्या भागात दिसले. हे विमान मुस्तांगच्या कोवांग गावात सापडले. १९ आसन असलेल्या या विमानात ४ भारतीय, ३ विदेशी आणि १३ नेपाळी प्रवासी होते, हे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यामुळे विमानाचा शोध लागला. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनूसार तारा एअरच्या विमानाला भुस्सखनामुळे लामचे नदी परिसरात अपघात झाला. नेपाळचे लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचत आहे, परंतू खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे मुंबईचे चार रहिवासी या विमानात आहेत.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

15 hours ago