सामाजिक

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त !

शिरूर : महान्यूज लाईव्ह

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील चोरीची दुचाकी कर्जत पोलिसांनी जप्त केली असून आरोपीस अटक केली आहे.

याबाबत कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राशीन येथील आठवडे बाजार दिवशी दुपारच्या सुमारास राशीन दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी सहायक फौजदार तुळशीदास सातपुते,आण्णासाहेब चव्हाण, पो.कॉ.शिंदे, पो.कॉ पोकळे हे कुठे गडबड गोंधळ होऊ नये चोरीसारखे प्रकार घडू नयेत म्हणुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आदेशा नुसार राशीन गावात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी राशीन येथील करमाळा चौकात एक व्यक्ती हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवर बसला होता मात्र त्या दुचाकीच्या पुढे आणि मागे एकही आरटीओ नंबरप्लेट नसल्याने पोलिसांच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकली. गाडीवरील चालक ही संशयित वाटला.आरोपी गणेश मंगेश काळे वय-२० ( रा.कुळधरण ता.कर्जत ) यास ताब्यात घेतले असता सदर व्यक्तीवर यापूर्वीचे चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याबाबत लक्षात आल्याने संशय आणखी बळावला. पोलिसांनी अधिक विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीच्या मालकीबाबत त्याला कसलेच उत्तर देता आले नाही. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण यांनी दुचाकीसह त्या व्यक्तीस कर्जत पोलीस ठाण्यात आणले.संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधित इसमाकडे आढळून आलेली दुचाकी ( शिरूर जि.पुणे ) येथून चोरीस गेली असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली आहे.

हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस हवालदार अण्णासाहेब चव्हाण, मारुती काळे, भाऊ काळे, संपत शिंदे, देविदास पळसे आदींनी केला आहे.

tdadmin

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

3 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

4 days ago