शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार : आमदार अशोक पवार

शिरूर : महान्यूज लाईव्ह

शिरूर हवेलीत राबविलेले अनेक उप्रकम राज्यात राबविले गेले असून ग्रामीण भागातील महिलांसाठी ही लवकरच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले.

पिंपळसुटी (ता.शिरूर)येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार अशोक पवार हे म्हणाले की,शिरूर तालुक्यात विकासकामे करत असताना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला जात आहे.मात्र अनेक ठिकाणी केवळ हेवेदावे निर्माण होत असल्याने त्यातून विकासकामे रखडली जातात. व गावचा ही विकास थांबतो.गावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर गावच्या अडचणी गावातच सोडविणे गरजेचे असून तरच अधिकाधिक विकासाला चालना मिळू शकेल असे ते म्हणाले.

आमदार अशोक पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की,राज्यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित तेच पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबविले गेले आहे.यामध्ये रेशनिंग मध्ये बायोमेट्रिक पद्धत,RO पाण्याचे शुद्धीकरण,तसेच कोरोना काळात रेमडीसिविर चा साठा अल्प प्रमाणात असताना व सातत्याने तुटवडा जाणवत असताना राज्यभर सर्वांना योग्य पद्धतीने वाटप व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे साठा देण्याचे ठरवले, हे सुद्धा पाठपुरावा केल्याने शक्य झाले.

या पुढील काळात गावच्या विकासात अडथळे ठरत असलेले शिव रस्ते, पाणंद रस्ते पूर्ण व्हावे यासाठी पाणंद रस्ते निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचबरोबर शहरात ज्या पद्धतीने महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असतात, त्याच सुविधा ग्रामीण भागातील महिलांना मिळावे यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, सरपंच रुपाली फराटे, उपसरपंच शशिकांत वेताळ, कोमल प्रदीप कापरे, निर्मला ठोंबरे, सविता शितोळे, ग्रामसेवक सुनीता बोरुडे, नानासो फलके, संभाजी फराटे, विष्णुपंत वाबळे, रावसाहेब फराटे, हनुमंत तांबे, रामभाऊ कापरे, बबन लगड, काका मोहिते, पंडित मोहिते सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक शशिकांत वेताळ यांनी केले. आभार ऋषिकांत फराटे यांनी मानले.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago