क्राईम डायरी

वेळु येथे १२ लाखाची वीज चोरी ! सहा जणांवर गुन्हा दाखल ! महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई !

माणिक पवार

भोर : महान्यूज लाईव्ह

भोर तालुक्यातील वेळु येथील बालाजी इंजिनिरींग वर्क येथील वीज मीटरमध्ये फेरफार करुन सहा जणांनी तब्बल १६८ महिेने ९४२२१ युनिटची चोरी करत वीज वितरण कंपनीचे १२ लाख ९ हजार १६० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वीजवितरण कंपनीच्या भरारी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाल श्रीराम पाटील यांनी फिर्याद दिली असुन त्या नुसार राजगड पोलिस ठाण्यात वीजग्राहक भाऊसाहेब वाडकर, वीज वापरणार बालाजी इंजिऩिअरिंग वर्कचे देविदास विबिषण गवारे, अजित काशिनाथ बाबर, राहुल गदादे, निलेश कुंडलिक जाधव, गणेश कोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभियंता गोपाल पाटील यांच्या भरारी पथकाने वीजचोरी शोधण्यासाठी बालाजी इंजिनिअरिंग वर्कला भेट दिली असता मीटरमधील करंट व टंगटोस्टर मधील करंट यांच्यामध्ये तफावत अढळल्याने तेथील वीज मीटर काढुन सील करुन वीजमिटर चाचणी विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथे अजित बाबर, निलेश जाधव यांच्यासमक्ष मीटरची तपासणी केली असता सदर वीज मीटर उणे ६५.९३३ टक्के इतक्या कमी प्रमाणात वीज नोंदणी करत असल्याचे दिसले. यासाठी वीज मीटर खोलुन पाहणी केली असता सी टी ब्लाँकचे कनेक्शन पीसीबी वरुन कट असल्याचे निदर्शनास आले. या केलेल्या फेरफारामुळे मीटरवर विजेच्या वापराची योग्य नोंद होऊ शकत नव्हती. ही वीजचोरी असल्याचे स्पष्ट होत होते. मागील १६८ महिने हा प्रकार चालु होता त्यामध्ये ९४ हजार २२१ युनिटची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महावितरण कंपनीचे १२ लाख ९१ हजार १६० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने वरील सहा जणांविरुध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पुढील तपास करत आहेत.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

2 days ago