क्राईम डायरी

मुलींच्या छेडछाडीच्या कारणावरून फलटणमध्ये भरदिवसा खून !

फलटण : महान्यूज लाईव्ह
 
श्रीराम मंदिर शेजारील टोपी चौकात निलेश हिरालाल चव्हाण व भरत फडतरे या दोघांना मुलींची छेडछाड का करतो, या कारणावरून वस्ताद सलीम शेख व त्यांची मुले सैफुल शेख व जमीर शेख आणि बिलाल आणि राज बागवान व इतर अनोळखी इसमांनी तलवार लोखंडी पाइप व दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये निलेश चव्हाण हा मयत झाला असून भरत फडतरे गंभीर जखमी झाला आहे.
  
काल दुपारी फलटण येथील टोपी चौकात निलेश चव्हाण व भरत फडतरे दोघांना आमच्या गल्लीतील मुलींची छेडछाड का करतो, या कारणावरून सलीम शेख यांनी लोखंडी तलवार, सैफुल शेख व जमीर शेख यांनी लोखंडी पाइप आणि बिलाल व  राज बागवान इतर इसमाने लाकडी दांडक्याने मारहाण केली.

या मारहाणीमध्ये निलेश चव्हाण व भरत फडतरे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता गंभीर दुखापतीच्या कारणास्तव पुढील उपचारांसाठी निलेश चव्हाण याला लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले तेथे त्याला मयत घोषित करण्यात आले. तर भारत फडतरे याला बारामती येथे उपचारासाठी हलवण्यात आले.  फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खुनासारखी गंभीर घटना घडल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस उपाधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशीरा फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. वरील चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक भारत किंद्रे पुढील तपास करीत आहेत.

tdadmin

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

2 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

18 hours ago