राजकीय

पाच राज्यांतील निवडणूकांच्या तारखा जाहीर ! १० मार्चला निकाल !

महान्यूज लाईव्ह टीम

निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली आहे. १० मार्चला या पाचही राज्यातील निवडणूकांची मतमोजणी असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.

या निवडणूका सात टप्प्यात होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणूका होत असल्याने त्यासंदर्भात विशेष काळजी निवडणूक आयोगाने घेतल्याचे दिसते आहे.

१५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅली आणि राजकीय सभांना परवानगी नाही. संसर्गाची परिस्थिती पाहून पुढील नियम जाहीर केली जाणार आहे.

गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी व ३ मार्च या दोन दिवशी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे, १० , १४, २० , २३ , २७ फेब्रुवारी, ३ व ७ मार्च या दिवशी उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात मतदान होईल.

कोवीड संसर्गामुळे निर्माण होणारी परिस्थिती पाहून निवडणूक प्रचाराबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

tdadmin

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

5 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

10 hours ago