भावानेच केला होता घात..! पण हे कळायला पाच महिने लागले! भिगवण पोलिसांनी कौशल्य पणाला लावले! आता खुनामागचे नेमके कारण शोधत आहेत पोलीस..!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील सुजित संभाजी जगताप हा 32 वर्षीय युवक 23 ऑगस्ट 2021 रोजी बेपत्ता झाला. चुलत भावाने बोलावले आहे, म्हणून रानात निघून गेलेला सुजित जगताप घरी आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी फिर्याद दिली. याचा तपास सुरू असताना पोलिसांना खुनी संशयित आरोपीने अनेकदा गुंगारा दिला. मात्र भिगवणचे पोलीस कमालीचे चिवट निघाले. सचोटीने व बारकाईने तांत्रिक विश्लेषण करत माहिती काढून सुजित याचा खून झाल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले, एवढेच नाही तर हा खून त्याच्या चुलत भावानेच केला हे देखील त्यांनी उघडकीस आणून किशोर बाळासाहेब जगताप यास अटक केली.

पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप पवार, फौजदार विनायक दडस पाटील, रुपेश कदम, सुभाष रुपनवर, नाना वीर, सचिन पवार, महेश माने, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे, आप्पा भांडवलकर, अतुल माने, अनिल ढवळे, सुहास पालकर यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली.

पोलिसांनी या घटनेचा तपास करताना परिसरात गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा किशोर बाळासाहेब जगताप याच्यावरती पोलिसांची संशयाची सुई वळाली. त्याच्याकडे अनेक दिवस तपास सुरू होता, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुरावा काहीच नसल्यामुळे पोलिसांपुढे अनेक प्रश्न होते. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि संशय आल्यानंतर किशोर याला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला.

तेव्हा शेटफळगडे येथील सुजित यांच्या शेतीमध्ये नेऊन सुजीचा खोऱ्याच्या लाकडी चाणक्याने खून करून ऊसाच्या शेतात खोल खड्डा खोदून पुरावा नष्ट करण्यात आला हे पोलिसांनी शिताफीने शोधून काढले. किशोर जगताप याने या खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले. आता किशोर जगताप याने नक्की कोणत्या कारणावरून सुजित जगताप याचा खून केला या घटनेमध्ये इतरही आणखी कुणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साक्षीदार आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

नरबळी की इतर कारणांमुळे खून?

दरम्यान या घटनेनंतर परिसरात अनेक अफवांना ऊत आला असून ही घटना म्हणजे नरबळी आहे की, इतर कारणांमुळे करण्यात आलेला खून आहे अशा अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान पोलिस आता या घटनेमागील नेमके कारण शोधत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतर यातील मुख्य कारण उघडकीस येईल.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago