गांजा एनसीबीने पकडला! पण कुठे? जळगावच्या एरंडोलमध्ये की नांदेडच्या नायगावमध्ये ? वेगवेगळ्या बातम्यांमुळे संभ्रम !

महान्यूज लाईव्ह विशेष

एनसीबीने मोठ्या प्रमाणात गांजा पकडला, पण नेमका कुठे?
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात की जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

काही माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात मांजरम येथे पाच ते सहा कोटींचा गांजा पकडला असल्याची माहिती देत आहेत. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची याबाबत व्हिडिओ क्लिपही दाखवली जात आहे.

परंतू एका वृत्तवाहिनीच्या वेब पोर्टलवर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे १५०० किलो गांजा पकडल्याची बातमी दिली गेली आहे. मात्र दोन्ही बातम्यांमध्ये दाखवला गेलेला फोटो मात्र एकच आहे. त्यामुळे गांजा नेमका कुठे व किती पकडला गेला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

5 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

10 hours ago