द ग्रेट खंडाळा पोलिस ! अपहरण केलेल्या इसमाची सहा तासात सुटका केली आणि ‘बारामती’ च्या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या ..!

खंडाळा : महान्यूज लाईव्ह

सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे पैशासाठी ‘बारामती‘च्या टोळीने अपहरण केले होते हा प्रकार अवघ्या सहा तासात पोलिसांनी उघडकीस आणला आणि चार जणांना अटक केले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील विटा येथील एक व्यापारी आणि त्यांचा मुलगा कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुण्यातील काम संपवून व्यापारी विटा सांगली कडे परतत असताना अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला आणि व्यवसायाच्या निमित्ताने बोलायचे सांगून त्यांना पारगाव खंडाळा एसटी स्टँड जवळील पूजा बिअर शॉपी मध्ये बार मध्ये बोलावून घेतले.

व्यवसायाचे निमित्त असल्याने व्यापारी व त्यांचा मुलगा पूजा बारमध्ये आले असताना आकाश टेंगले व अनोळखी इसमांनी त्यांना उसने घेतलेले पैसे आता परत करा, अन्यथा तुमच्या मुलाला आम्ही बारामती ला उचलून घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

आणि लगेच एका महिंद्रा 500 एसयु व्ही या गाडीमध्ये बसवून पळवून नेले. या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार खंडाळा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनोळखी आरोपी आणि अपहरण करणाऱ्या अपहरण झालेल्या मुलाच्या मोबाईल नंबरचे लोकेशन व गुन्ह्यातील गाडीच्या दिलेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी तपासाला सुरुवात केली व फौजदार शंकर पांगारे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार यांचे पथक तयार करून माळेगाव बारामती येथून अवघ्या सहा तासांमध्ये आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेत आकाश रघुनाथ टेंगले (वय 28 वर्षे रा. मानापावस्ती पणदरे, ता. बारामती), अल्ताफ अब्बास इनामदार (वय 40 वर्ष, रा. म्हसोबाची वाडी तालुका बारामती), राहुल भारत सोनवणे (वय 30 वर्षे राहणार माळेगाव बुद्रुक सावतामाळी नगर तालुका बारामती), चंद्रकांत जावळे (वय 24 वर्ष, रा. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ माळेगाव ता. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे. शशिकांत क्षीरसागर तपास करत आहेत.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago