बला;त्काराचा आरोप असलेल्या सहाय्यक निरीक्षकाने पीडित महिलेच्या मुलीवर रोखले होते पिस्तूल! त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी गेलेल्या डिवायएसपीवरच केला गोळीबार!

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर गोळीबार

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यावर बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याने गोळीबार केला. सुदैवाने उप विभागीय अधिकारी मेटके थोडक्यात बचावले आहेत. मात्र या घटनेने नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे

राहुरी येथे मागील काही दिवसांपूर्वी पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांच्या विरुद्ध ३० सप्टेबर रोजी एका महिलेने अत्या;चाराची फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात लोखंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरच्या गुन्ह्याबाबत पीडित महिलेने जबाब दिल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची भीती पोलीस अधिकारी लोखंडे यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे लोखंडे यांनी सकाळी पीडितेच्या घरात घुसून त्याच्याजवळील बंदूक पीडित महिला व त्याच्या दोन मुलीवर ताणली.

याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने लोखंडे यांनी हवेते गोळी झाडली.

त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे सांगून पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस लोखंडे यांच्या बंदुकीच्या निशाण्यावर असलेल्या मुलींना त्यांच्या ताब्यातून सुखरूप बाजूला काढले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी लोखंडे त्यांच्यावर झडप घातली. त्यावेळी लोखंडे यांनी मिटके यांच्यासमोर गोळी झाडली.

सुदैवाने बंदुकीतून सुटलेली गोळीची दिशा चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने लोखंडे यास ताब्यात घेतले असून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago