मनोहर भोसले व ओंकार शिंदेला बारामतीत जामीन मंजूर..!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामतीतील अंधश्रद्धाविरोधी निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या मनोहर भोसले व सहआरोपी ओंकार शिंदे याला आज बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मनोहर भोसले आणि ओंकार शिंदे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस टी भालेराव यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये अॅड. रोहित गायकवाड, हेमंत नरूटे व रणजित गावडे यांनी मनोहर भोसले व ओंकार शिंदे या दोघांच्या जामीनासंदर्भात युक्तिवाद केला.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनोहर भोसले याला 60 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला, तर ओंकार शिंदे यांना तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

32 mins ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

5 hours ago