जुन्नर येथील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे याच्यावर तिसरा गुन्हा; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप..!

जुन्नर: महान्यूज लाईव्ह

जुन्नर येथील शिवॠण प्रतिष्ठान या संस्थेचा संस्थापक आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता शिवभक्त अक्षय बोऱ्हाडे याच्या वरोधात तिसरा गुन्हा दाखल झाला असून, खंडणी व पत्नीच्या तक्रारीनंतर, आता एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

तीन दिवसात तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे अक्षय बोऱ्हाडे याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अक्षय बोऱ्हाडे याला शहा एचपी गॅस वितरक रुपेश शहा यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लागलीच अक्षयची पत्नी रूपाली यांनी पती अक्षय याच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप करून गुन्हा दाखल केला आणि आता पुन्हा एका तरुणीने अक्षय विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसापूर्वीच अक्षयची पत्नी रुपाली हिने अक्षय हा शिवॠण प्रतिष्ठान या संस्थेमध्ये आलेल्या देणगीचा गैरवापर मुलींवर पैसे उधळण्यासाठी करत असून, त्याचे अनेक तरुणी व महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एक तरुणी पुढे आली असून तिने अक्षयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय बोराडे याने इतर कुणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान रूपाली यांनी अक्षय याच्यावर आणखी एक गंभीर आरोप करताना, अक्षय हा प्रतिष्ठान मधील रुग्णांना व आश्रितांना रात्रीचा अचानक घेऊन जायचा. त्यांना तो कोठेही सोडायचा. त्यांना तो कोठे सोडायचा हे माहिती नाही. मात्र तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना फसवतोय; त्यामुळे त्याची सत्यता पुढे आली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

1 day ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago