थरारक व्हिडिओ पहा : तरसाचा ज्येष्ठ नागरिकावर हल्ला..! थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद..!

शिरूर : महान्यूज लाईव्ह

पुण्यात तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने वृद्ध सुदैवाने बचावले.

अर्थात सैरावैरा धावणाऱ्या या तरसाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात तरसाचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेले दिसताहेत.

तेव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर येऊन पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात  अक्षरशः जबड्यात धरतो. गावातील तरुण हातात काठ्या घेऊन याच तरसाच्या शोधात होते. सुदैवाने एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता.

याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह युट्यूब वर पाहू शकता..

त्या तरुणाने तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीने प्रहार केला. काही वेळाने तरस तेथून पळून गेला, पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले होते. तिथंच असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व थरार कैद झाला. तसेच दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला या तरसाने चावा घेतला. नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाच्या तोंडाला जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा नंतर मृत्यू झाला. अशी माहिती खेड वनविभागाने दिली.

Maha News Live

Recent Posts