वाई पोलिसांची होती विना परवाना वाळूच्या वाहतूकीवर करडी नजर; पाच लाखांचा मुद्देमाल केला जप्त…

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

वाई : पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागाचे रमेश पवार सुजाता मोकाशी सोनाली माने वाहन चालक अमित गोळे हे पोलिस पथक वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल खराडे – जानवे आणि पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ऑगस्ट रोजी पहाटे पावणेचार वाजता वाई पाचवड रस्त्यावर हॉटेल शिवशाही समोर रात्र गस्त घालत असताना या पथकास खास खबऱ्यामार्फत खबर मिळाली कि बावधन बाजु कडुन एक वाळुने भरलेला डंपर वाईच्या दिशेने येत आहे.

त्यामुळे हे पोलिस पथक बावधन नाका येथे सापळा लावुन डंपरची वाट पाहत असतानाच अचानकपणे भरघाव वेगात डंपर आला, पण चालकाने पोलिस पाहताच त्याने कसलाही विचार न करता व पोलिसांनी हात दाखवून देखील न
थांबताच रस्ता ओला करत वेगाने शिवाजी चौकाच्या दिशेने भरघाव वेगात सुसाट नेला.

मग पथकाने चित्तथरारक पाठलाग करुन डंपरला पोलिस वाहन आडवे घालून अखेर डंपर थांबवला व चालकाकडे कसून चौकशी केली असता त्याने डंपर मध्ये ३ ब्रास वाळु असल्याचे सांगितले. त्यास वाळु वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याने परवाना नसल्याचे सांगीतले.

त्यावरील चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने मच्छिंद्र महेंद्र पिसाळ (वय ३० वर्ष राहणार बावधन ता.वाई) असे सांगितले. ज्ञानेश्वर हणमंत पिसाळ (रा. बावधन) असे डंपरच्या मालकाचे नाव असल्याची माहिती दिली. पुढील कारवाई साठी या पोलिस पथकाने वाळुने भरलेला डंपरसह पाच लाख रुपयांचा मद्देमाल जप्त करुन
वाई पोलिस ठाण्यात आणला.

डंपर क्र. एम.एच.११ सी.एच.३१९७ या वरील चालक असणारा मच्छिंद्र महेंद्र पिसाळ (रा. बावधन) याच्याविरुद्ध विना परवाना वाळूची चोरटी वाहतुक करत असल्याबाबतची वाहतूक शाखेचे हवालदार रमेश पवार यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली व गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत दरम्यान या पुढेही वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्या वाळूची वाहतुक करताना जर कोणी आढळून आल्यास अशा सर्वांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली‌.

कुठल्याही अमिषाला बळी न पडता थेट तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केल्याबद्दल या पथकाचे वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे आणी पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे यांनी अभिनंदन केले.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

1 day ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago