माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर, दि. २२ – राज्यातील अनाथ असणाऱ्या मुलांचा संगोपन करण्यासाठी सुरु केलेल्या नसरापूर ( ता. भोर ) येथील माऊली अनाथालयाला पुणे येथील शारदा फाऊंडेशन परिवाराच्या वतीने जीवनावश्यक अन्नधान्य देऊन आश्रमाला मदतीचा हात दिला आहे.

पुण्यातील आंबेगाव खुर्द येथील माजी सरपंच गणेश वनशीव यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा फाऊंडेशनच्या वतीने माजी सरपंच गणेश वनशीव यांच्या हस्ते माऊली अनाथालयाचे मठाधिपती नवनाथ महाराज लिमण यांच्याकडे जीवनावश्यक व अन्नधान्य सुुुपूर्द करण्यात आले.

यावेळी शामभाऊ शिंदे, गणेश जाधव, दशरथ बोडके, गौतम वनशीव, रमेश वनशीव, मंगेश जगताप, सुधीर यादव, नागेश जाधव, प्रमोद जगताप, माऊली झेंडे आदी उपस्थित होते.

माजी सरपंच गणेश वनशीव यांनी बोलताना सांगितले की, अनाथ मुलांना सांभाळून त्याच्यावर चांगले संस्कार करून सांप्रदायिक पिढी घडविण्याचे मौलिक कार्य नवनाथ महाराज लिमण करत आहे. ही बाब अभिमानाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शामभाऊ शिंदे म्हणाले की, गणेश वनशीव यांनी स्वतःचा जन्मदिन विधायक पद्धतीने केलेले कार्य चांगले असून याचा आदर्श समाजातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन करत या आश्रमाला नेहमी मदत करू अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. वैकुंठवासी माऊली महाराज लिमण यांच्या स्मरणार्थ बनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली असून आई वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांचा सांभाळ करत असल्याची नवनाथ महाराज लिमण यांनी दिली.

Maha News Live

Recent Posts