Featured

मोठ्या प्रमाणात असलेली युवाशक्ती हीच शिवसेनेची ओळख : सत्यवान उभे

माणिक पवार : महान्यूज लाईव्ह

भोर, दि. १९ _ आजही युवावर्ग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रेरणेने युवासेनेच्या माध्यमातून धडाडीचे कार्य करत असल्याचे पाहून आमच्या सारख्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांना आनंद आणि समाधान होत असल्याची भावना व्यक्त करत मोठ्या प्रमाणात असलेली युवाशक्ती हीच शिवसेनेची ओळख असल्याचे मत शिवसेनेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांनी व्यक्त केले.

युवासेनेचे राज्य विस्तारक गणेश कवडे, युवासेना जिल्हाअधिकारी अविनाश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भोरमध्ये पार पडलेल्या युवा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, शिवसहकार सेनेचे सपंर्कप्रमुख प्रदीप खोपडे, जिल्हा संघटिका संगीता पवळे, माजी उपसभापती अमोल पांगारे, भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, वेल्हा तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, उपतालुकाप्रमुख, अंकुश चोरघे, दत्ता देशमाने, निशा सपकाळ, जयश्री शेंडकर, दिनकर पिसे उपस्थित होते.

कुलदीप कोंडे म्हणाले, की, प्रथमच युवासेनेचा मोठ्या प्रमाणात भोरमध्ये उपक्रम होत आहे. भविष्यात युवा पिढीला काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी असून युवा कार्यकर्त्यांना शिवसेना कायम पाठबळ देईल .

युवाशक्ती हीच समाजात परिवर्तन आणू शकते आणि त्यातूनच एका चांगल्या समाजाची पायाभरणी होऊ शकते. सरसेनापती बाळासाहेबांना अपेक्षित असणारे कार्य खऱ्या अर्थाने युवासेना करत असून वंचित घटकांना नेहमी न्याय देण्याचे काम युवासेना करत असल्याची माहिती युवासेनेचे गणेश कवडे आणि अविनाश बलकवडे यांनी दिली. यावेळी युवासेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज जगताप यांनी केले.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago