इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरघोस निधी आणला जाईल : प्रदीप गारटकर यांची ग्वाही

टाऊन हाॅल सुशोभिकरणाचे गारटकर यांच्या हस्ते भुमीपूजन

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून शहरात कोट्यावधी रुपयांची कामे चालू आहेत. इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरघोस निधी मंजूर करून आणला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रयत्नातून व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र ५ व्यंकटेशनगर मधील भार्गवराम तलाव येथील टाऊन हाॅलचे सुशोभीकरण या कामांचे भूमिपूजन प्रदीप गारटकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष उमा इंगुले, माजी नगराध्यक्ष सुरेश गवळी, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजेंद्र चौगुले, नगरसेवक स्वप्निल राऊत, अनिकेत वाघ, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, अशोक गानबोटे,जेष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष दिलीपराव वाघमारे, महादेव लोखंडे, साजन ढावरे, समद सय्यद, मुकुंद साळुंखे, विकास खिलारे, ॲड.आशितोष भोसले, स्मिताताई पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष वसिमभाई बागवान यांनी केले.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

6 hours ago