Featured

इंदापूर तालुक्यात ११० कोटीनंतर पुन्हा रस्ते व पुलांसाठी ८३ कोटी!

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर – तालुक्यातील रस्ते व पूल बांधण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून ८३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या निधीतून तालुक्यातील पिंपळे ते शेटफळगढे रस्ता (९ कोटी),कळस ते लाकडी रस्ता (१२ कोटी), कळस येथील बिरोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग ते डाळज नं.२ पर्यंतचा रस्ता (२ कोटी) विठ्ठलवाडी (कळस) ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता (२ कोटी), पारेकरवस्ती ते निसर्ग हॉटेल पर्यंतचा रस्ता, कर्मयोगी साखर कारखाना ते इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेज पर्यंतचा रस्ता व इंदापूर बेडशिंगे रोड ते गलांडवाडी नं.२ ते बाभूळगाव पर्यंतच्या रस्त्यासाठी १५ कोटी, भोंगवस्ती ते कर्मयोगी साखर कारखान्यापर्यंतचा रस्ता व कालठण नं.२ ते शिरसोडी ते भीमा नदीपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी,

नीरनिमगाव ते कचरवाडी ते सराटी ते चाकाटी रस्ता व सराटी ते गणेशवाडी रस्त्यासाठी ९ कोटी, पळसदेव ते न्हावी ते थोरातवाडी ते व्याहाळी रस्त्यासाठी १२ कोटी, भावडी फाटा ते चांडगाव रस्त्यासाठी ३ कोटी तर रेडा ते शेटफळ हवेली या रस्त्यासाठी ६ कोटींचा निधी दिला आहे. तर अकोले ते कळस रस्त्यावरील ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी अडीच कोटी तर याच रस्त्यावरील मुठा उजव्या कालव्यावर पूल बांधण्यासाठी दिड कोटींचा निधी दिला आहे.

तसेच तावशी ते थोरातवाडी रस्त्यावरील दोन ठिकाणच्या ओढ्यांवर पूल बांधण्यासाठी दिड कोटींचा निधी दिला आहे. अजूनही काही विकासकामे प्रलंबित असून त्यासाठीच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

9 hours ago