महागाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

संदीप मापारी पाटील, बुलढाणा

लोणार : अनावश्यक वस्तूंची झालेली महागाई कमी करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अन्यथा मोठ्या स्वरूपात जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवणेऐवजी उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीण समयी शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी 21 जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

सचिन सावळे, वैभव दिजे, तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, महासचिव बळीभाऊ मोरे, गौतम गवळी,
बहुजन आघाडी च्या वतीने तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात निश्चित
समाधान डोके वैभव प्रधान गोपाल प्रधान सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Maha News Live

Recent Posts

बारामतीत एसीबीची कारवाई! तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्यास रंगेहाथ पकडले!

बारामती : महान्यूज लाईव्ह बारामतीत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच तलाठ्यासाठी स्वीकारताना…

13 hours ago