राष्ट्रवादीने घेतला कौतुकास्पद पुढाकार! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 कोटींची मदत

शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह

मुंबई: महाराष्ट्रात 18 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येणार असल्यामुळे राज्यावर या लसीकरणाच्या जास्त भार पडणार असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी त्याचा एक वर्षाचे वेतन आणि काँगेस आमदारांचे वेतन हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले असून, या कार्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील कौतुकास्पद पुढाकार घेत सहभाग घेतला आहे.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे 1 कोटी रुपये आणि राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एका महिन्याचे वेतन हे सर्व मिळून तब्बल 2 कोटी रुपयांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

गेल्यावर्षी पासून महाराष्ट्रातील जनतेला व प्रशासनाला अनेक संकटांना तोंड देवून लढत लागत आहे. तरी, एकूणच जगभराचा आर्थिक व्यवहार मंदावला असून, राज्याच्या तिजोरीवर याचा ताण पडत आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या सर्वांना मोफत लसीकरण करण्याच्या निर्णयामुळे तिजोरीवर आता जास्तीचा भार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याला प्रत्येक संकटात सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले असून, या निधीचा स्वीकार करावा, अशी विनंती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त अजित पवार, विश्वस्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वस्त सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मुंबईच्या युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केला आहे.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

3 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

4 days ago