वाळू माफियांचे धाबे दणाणले, महान्यूजने केले होते वृत्त प्रसिध्द
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडच्या भिमा नदी पात्रात मागील काही दिवसापासून स्थानिक वाळू माफियांनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसाचा हौदास घातला होता. अखेर महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील शिरापुर हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या 13 यांत्रिक फायबर बोटी उध्दवस्त केल्या.
मागील अनेक दिवसापासून राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातून दौंड तालुक्यातील पूर्व भागातील शिरापुर, मलठण, राजेगाव, वाटलूज नायगाव, खानोटा आदी गावांतील हद्दीत स्थानिक वाळू माफियांनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने खुलेआम दिवसरात्र वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला होता. नदीलगतच्या शेतकरांना याचा नाहक त्रास होत होता. तक्रारी करूनही संबंधित वाळू माफियावर कारवाई होत नव्हती. याबाबत महान्यूज लाईव्हने बातमी प्रसिध्द केली होती.
आज बुधवारी ( दि.30 ) तहलसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडल अधिकारी अजित मोहिते, सुनील जाधव, विजय खारतोडे तसेच देऊळगाव राजे, दौंड, वरवंड मंडलातील तलाठी यांच्या पथकाने शिरापूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 10 फायबर व 3 सेक्शन असे एकूण 13 यांत्रिक बोटी उद्ध्वस्त केल्या.










