महान्यूज: आजची गझल
पालवी ने दिली.. ना फुलाने दिली..
सावलीही मला.. या उन्हाने दिली..
याचसाठी तुझा मी ऋणी राहिलो
तू शिवीही मला आदराने दिली..
मी न पुसले तुला नाव तुटली तरी
फूल घेऊन तू का.. तुफाने दिली..
गाय होऊन ती धावली मग पुन्हा
हाक आई जशी.. वासराने दिली..
शेवटी राहते काय अपुले इथे
जाण मज भंगल्या खापराने दिली..
वाकलो ना कधी सौख्य चाखावया
मी मला..यातना मीपणाने दिली..
गझल ह्रदयातुनी आर्त किंकाळली
हाक अंतिम जशी पाडसाने दिली..
गझलकार- प्रफुल्ल भुजाडे
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











अप्रतिम