इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज कोरोनाने बड्यांना घेरले. मोहोळच्या आमदारांना तसेच इंदापूर पंचायत समितीच्या उपसभपातींना देखील कोरोनाची लागण झाल्याचे इंदापूर तालुक्यातील आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले, जाचकवस्ती येथील एकाच कुटुंबातील नऊ जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. आज नव्याने १४ जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
भवानीनगर येथेही जुन्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील आणखी एकास कोरोनाची लागण झाली आहे. कुरवली येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे. पडस्थळ .येथील ६५ वर्षीय पुरूष, पिंपरी बुद्रुक येथील ६५ वर्षीय पुरूष, भिगवण येथील ४५ वर्षीय पुरूष रुग्णासही कोरोनाची लागण झाली आहे.
जाचकवस्ती येथील एक व्यावसायिक कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील कुटुंबियांपैकी २७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, २३ वर्.ीय महिला, २५ वर्षीय महिला, २ वर्षीय चिमुकली, २ महिन्याची चिमुकली, ४५ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरूष असे रुग्ण आढळून आले आहेत. इंदापूर शहरातील येथील ६२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून गोखळी येथील १७ वर्षीय युवक, लासुर्णे येथील चार वर्षीय मुलगी, इंदापूर शहरातील कसबा येथील २२ वर्षीय युवक, वरकुटे खुर्द येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
माझी प्रकृती उत्तम, तुम्ही काळजी घ्या -आमदार यशवंत माने
मोहोळचे आमदार यशवंत माने हे इंदापूर तालुक्यातील शेळगावचे रहिवासी आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व सोळा वर्षीय मुलीसही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे स्वीय सहायक संतोष ननवरे यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते सध्या पुण्यात खासगी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आपली प्रकृती उत्तम असून सर्वांनी आपापली काळजी घ्यावी, वेळीच तपासणी करावी असा सल्ला यशवंत माने यांनी दिला आहे.










