दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून सांधिक प्रयत्नांतून व शेतकरी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर किसन वीर यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करेल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी व्यक्त केला.
भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या मिल विभागातील रोलरचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते कळ दाबून रोलर बसविण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. भोसले पुढे म्हणाले, ऊस गाळपासाठी आवश्यक यंत्रणेची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, विजया साबळे, आशा फाळके, प्र. कार्यकारी संचालक अशोक एम. शिंदे, सेक्रेटरी एन. एन. काळोखे आदींसह कारखान्याचे
चीफ इंजिनिअर संदीप सुर्यवंशी, चीफ केमिस्ट विकास गाढवे, इन्चार्ज ॲग्री मॅनेजर विठ्ठल कदम, को-जन मॅनेजर डी. आर. वाघोले, डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले, सिनियर इंजिनिअर अजयकुमार फडतरे, एच आर. मॅनेजर ए. टी. शिंगटे, डॉ. दत्तात्रेय फाळके, जयवंत साबळे, अॅड. अजित केंजळे, अॅड. अमरसिंह भोसले, मानसिंग शिंगटे, अनिल वाघमळे, कारखान्याचे सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.











