दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
ओझर्डे (ता.वाई) येथील श्रीमती राजश्री नरसिंगराव पिसाळ (देशमुख) यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले .
सकाळ वृत्तपत्र समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र पिसाळ आणि ओझर्डे येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजयसिंह पिसाळ यांच्या त्या मातोश्री आहेत.
मनमिळाऊ स्वभावाच्या राजश्री पिसाळ देशमुख यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.











