मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून दोन पदे नको या तत्त्वानुसार त्यांनी हा राजीनामा दिल्याचे समजते थोरात यांनी दिल्लीत जाऊन हा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्याकडे काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष असून स्वतः बाळासाहेब थोरात दोन पदांखेरीज विधिमंडळाचे पक्षप्रतोद देखील होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात व्यूहरचना सुरू होती. त्यामुळे नाराज गटाची नाराजी लक्षात घेता थोरात यांनी दिल्लीत जाऊन राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
भाई जगताप यांच्या मुंबई अध्यक्ष पदानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आता पहा कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता कॉंग्रेसच्या मंडळींमध्ये आहे.