इंदापूर : महान्यूज लाईव्ह
काल इंदापूर तालुक्यात अवघे पाच जण कोरोना बाधित आढळून आले होते, आजच्या दिवसभरात मात्र ही संख्या 26 वर पोहोचली आहे. कोरोना जेवढ्या तपासण्या होत आहेत, तेवढ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा वाढताना दिसत असून काळजी करण्याइतपत गरज आहे.
इंदापूर तालुक्यात काल पाच जण कोरोना बाधित आढळून आले होते. यामध्ये बिजवडी येथील 60 वर्षीय पुरुष, सणसर येथील 18 वर्षीय महिला, भिगवण येथील 60 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 55 वर्षीय पुरुष व व्यहाळी येथील 55 वर्षीय महिला यांचा समावेश होता.
मद्रास इंदापूर तालुक्यात तब्बल 26 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये भवानीनगर येथील तिघेजण असून यामध्ये 23 वर्षीय पुरुष 53 वर्षीय पुरुष 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बोरी येथील 49 वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील 56 वर्षीय महिला, तक्रारवाडी येथील 43 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील नगरसेवकासह 68 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगी, चार वर्षीय मुलगा, 25 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
झगडेवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बेडसिंगे येथील 55 वर्षीय पुरुष, शेटफळगडे येथील 44 वर्षीय पुरुष, पिंपळे येथील 32 वर्षीय पुरुष, अंथुर्णे येथील 40 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, तावशी येथील 23 वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील 25 वर्षीय पुरुष व सपकळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.