महान्यूज : आजची गझल
सारे असुनी तणाव आहे
नक्की कसला अभाव आहे ?
मानगुटीवर बसून असते
तो दु:खाचा स्वभाव आहे
अश्रूंना हसण्याचे कोंदण
खुशी नव्हे.. तो बनाव आहे
मुखवट्यास हे कोठे कळते
चेहऱ्यावरती दबाव आहे
जगण्याबद्दल बोलू आधी
मृत्यू अंतिम ठराव आहे
स्मशानात ओसरते भीती
हा सत्याचा प्रभाव आहे
गझलकार – विश्वास कुलकर्णी,कोल्हापूर.
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड












वाह