महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
ज्या गोष्टीमुळे पालकांनी सुस्कारा सोडला होता ती गोष्ट पुन्हा एकदा पालकांच्या मानगुटीवर येऊन बसणार आहे.
चिनी कंपन्यांच्या ॲप वर बंदी घातल्यानंतर पब्जी चा देखील त्यात समावेश होता. त्यामुळे पालक अतिशय समाधानी झाले होते, मात्र पब्जी पुन्हा एकदा भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करत असून चिनी कंपनीशी भागीदारीचा व्यवहार तोडल्यानंतर मूळची दक्षिण कोरियन असलेले कंपनी पुन्हा एकदा भारतात येण्याच्या तयारीत आहे.
या कंपनीने भारतातील त्यांचे जे स्ट्रिमर्स आजपर्यंत कार्यरत होते, त्यांना आपण पुन्हा येणार आहोत अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. पब्जी कार्पोरेशन यासंदर्भात अजून जाहीर घोषणा केली नसली, तरी दिवाळीच्या नंतर अथवा दिवाळीच्या दरम्यान पब्जी कंपनी भारतामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.











