महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
नांदेड जिल्हा आज एका वेगळ्या घटनेने हादरला. हदगाव येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली.
नांदेडमधील व्यापारी प्रवीण भगवानराव वल्लमशेटवार हे आपल्या कुटुंबासह नांदेडला जातो असे सांगून भाडोत्री गाडी घेऊन गेले. मात्र ते सहस्त्रकुंड येथे पोचले व गाडी चालकास कारण सांगून पाठवून दिले आणि त्यानंतर मुरली गावानजिकच्या धबधब्यात त्या पाचही जणांनी उडी मारली.
प्रविण वल्लमशेटवार यांचा मृतदेह किनवट तालुक्यात इस्लामपूर नजिक आढळून आला. तर दराटी गावच्या शेजारी त्यांचा मुलगा सिध्देश, पत्नी अश्विनी वल्लमशेटवार यांचा मृतदेह आढळून आला.
शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी मालमत्तेच्या वादातून ही आत्महत्या झाल्याचे बोलले जात आहे.











