इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचा कोरोनाने काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था उभी राहिली. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेने आपल्या शिक्षक सभासदांसाठी असलेल्या शिक्षक कल्याण निधीतुन संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता संतोष खुटाळे यांना व सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा सोपान कांबळे यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश आज सुपूर्त केला.
शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ, उपसभापती वसंत फलफले यांचे हस्ते व माजी सभापती किरण म्हेत्रे, माजी सभापती संभाजी काळे, माजी सभापती सुनिल शिंदे, माजी सभापती विलास शिंदे, माजी उपसभापती दत्तात्रय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, संचालक बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनिल चव्हाण, सचिव संजय लोहार, माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत, प्रविण धाईंजे, प्रताप शिरसट, शिक्षक नेते सयाजी येवले, सदाशिव रणदिवे यांच्या उपस्थितीत धनादेश दिला.
इंदापूर शिक्षक सहकारी पतसंस्थेने सर्व सभासदांचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे. तसेच शिक्षक सभासदाचे कोणत्याही कारणाने निधन झालेस त्या शिक्षकांच्या कायदेशीर वारसास शिक्षक कल्याण निधीतून १० लाखांची मदत तात्काळ व तत्परतेने दिली जाते. या मदतीमुळे शिक्षक कुटूंबास मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. शिक्षक कल्याण निधीतुन शिक्षक सभासदांना विविध आजारासाठी तात्काळ ५० हजारांची मदत दिली जाते अशी माहिती सूत्रांनी दिली.











