महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
चंद्रकांत दादा पहाटे पुन्हा भूकंप होणार असल्याचे ते म्हणाले त्यांनी गजर लावला आहे का? असे म्हणत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली.
राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी पलटवार केला. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. राज्यात निवडणूका होणार, की नाही होणार हे सांगण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. मात्र निवडणुका कधी होणार, हे जर चंद्रकांत पाटील यांना माहीत असेल आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे.
सध्या अनेक गजर असे महाराष्ट्रात सुरू आहेत असे म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर राऊत यांनी टीका केली.










