सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका अधिकाऱ्याकडे जर 11 कोटी सापडत असतील, तर इतरांचे काय? या देशांमध्ये नोटाबंदी करून काहीही उपयोग झाला नाही, याचे उदाहरण म्हणजे बिहारमधील तारिणी दास या बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यावरील छापा!!
तारिणी दास यांच्याकडे अकरा कोटी सापडल्याने ईडीचे अधिकारी देखील चक्रावले. तारिणी दास यांच्या बंगल्यात जेव्हा छापीमारी झाली, तेव्हा घरात हे पैसे सापडल्यानंतर चार मशीन मागवण्यात आल्या. या चार मशीन तब्बल आठ तास पैसे मोजत होत्या. तारिणी दास यांच्या नातेवाईकांकडे देखील ईडीने छापेमारी केली. दरम्यान एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यावरती ही छापेमारी करण्यात आल्याने बिहारमधील इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणात आणखी अनेक अधिकारी सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला असून त्या अंतर्गत ही चौकशी सुरू होती.
वास्तविक तारिणी दास हे 31 ऑक्टोबर 2024 रोजी निवृत्त झाले होते. पण पुन्हा त्याच पदावर त्यांना मुदत वाढ देण्यात आली. दोन वर्षाचा त्यासाठी करार करण्यात आला. सरकारने त्यांच्यावर मेहरबानी का केली? हे आता समोर येऊ लागले आहे.
.











