विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
व्यायाम करायचा झाला तरी अवघ्या पाच ते दहा पावलांपर्यंतचाच…. मणक्याचा आजार बळावलेला.. त्यात हृदयविकार आणि मधुमेह जोडीला.. अशा स्थितीत 68 वर्षीय त्या आजी मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील तज्ञांना विचारत होत्या..डॉक्टर, मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने किंवा कायमचं झोपूनच राहावे लागते का हो?… डॉक्टरांनी शंका समाधान तर केलंच पण अवघ्या काही दिवसातच स्वतःच्या पायावर वेदना रहित चालण्याचा अनुभव मिळताच या आजी देखील सुखावल्या..!
बारामती हे वैद्यकीय क्षेत्राचे एक मेडिकल हब बनले आहे.. येथील निष्णात वैद्यकीय तज्ञांमुळे ग्रामीण भागातील व निमशहरी भागातील रुग्णांचा वेळ, पैसा आणि मोठी पायपीट देखील वाचली आहे. बारामती मध्ये अशाच निष्णात वैद्यकीय तज्ञांनी 68 वर्षीय जेष्ठ महिलेवर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे.. सध्या कौतुक सुरू आहे!
मेहता मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अस्तितज्ञ व मणक्याच्या शस्त्रक्रियेचे तज्ञ डॉ. सौरभ तळेकर त्यांनी नुकतीच बारामती मधील एका ज्येष्ठ महिला रुग्णावर यशस्वीरित्या मणक्याची शस्त्रक्रिया केली आहे. या महिलेस मधुमेह व हृदयविकार हे दोन्ही आजार होते. शिवाय वर्षभर असह्य वेदना देणारी कंबरदुखी देखील सुरू झाली होती. सुरुवातीला वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या. तात्पुरता आराम मिळायचा, मात्र हळूहळू ही कंबरदुखी वाढू लागली. पायामध्ये सतत मुंग्या येण्याची लक्षणे दिसू लागली.
एक वर्षापासून चालायचंही कमी झालं. अखेर काही डॉक्टरांनी सल्ला दिला नंतर नातू आजींना घेऊन डॉ. सौरभ तळेकर यांना भेटला. त्यातच कोणीतरी मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल बरेचस गैरसमज सांगितले. त्यामुळे भीती आणि वेदना या दोन्ही गोष्टी चेहऱ्यावर घेऊन आजींनी शस्त्रक्रिया विषयाची आपली शंका विचारली. डॉक्टरांनी अगोदर एम आर आय करण्याचा सल्ला दिला आणि मणक्याच्या या स्कॅनिंग मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मणक्याची गादी सरकल्याने ती मणक्यांच्या नसावर दबाव टाकत असल्याचे दिसून आले.
डॉक्टर आणि त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला शिवाय ही शस्त्रक्रिया यशस्वी होते आणि तुम्ही वेदना मुक्त व्हाल असा आशावादही दिला. आजींनी या शस्त्रक्रियेला संमती दिली आणि
डॉ सौरभ तळेकर यांनी या शस्त्रक्रियेचा उद्देश फक्त ‘दुखणे जाणे’ हा नसून ‘दुखणे ,वेदना पूर्णपणे कमी होऊन त्यांना पुन्हा व्यवस्थित आधी सारखे चालता येणे हा आहे हा विश्वास दिला.
आजींची डीस्केक्टोमी विथ फिक्सेशन ही शस्त्रक्रिया करण्यासाठी स्पाईन सर्जन डॉ. सौरभ तळेकर, भूलतज्ज्ञ डॉ निकिता विशाल मेहता, डॉ संजय खाडे यांच्या उपस्थितीत मणक्याच्या गादीवरचा दाब काढला गेला. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर फिजिओथेरपी डॉ. मुग्धा नसरापुरकर यांनी सुरू केली. डॉ.चेतन देवकाते यांनी वेळोवेळी रुग्णांशी केलेला संवाद यामुळे आजींचा आत्मविश्वास वाढत होता आणि त्यांच्या वेदना, पायाला, कंबरेला येणाऱ्या मुंग्या बंद झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी आजींनी चालायला, पायऱ्या चढउतार करण्यास सुरुवात केली.











