मुंबई : महान्यूज लाईव्ह
ही घटना आहे मुंबईच्या बेलापूर भागातल्या पंचशीलनगर नावाच्या झोपडपट्टीतील. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. निमित्त काय होतं माहित आहे का? लहान मुलाने म्हणजे नऊ महिन्याच्या मुलाने रस्त्यावर संडास केली म्हणून! आई-वडिलांसह मुलावरही कुऱ्हाडीने वार करण्यात आले.
या घटनेत पोलिसांनी राजू सट्टा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नऊ महिन्यांचा आयान शेख यामध्ये गंभीर जखमी झाला असून अंजली खंदारे उर्फ अंजली उस्मान शेख व तिचा पती उस्मान शेख या तिघांनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
या घटने संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेख कुटुंब हे बेलापूर गावातील पंचशीलनगर येथील झोपडपट्टीमध्ये राहते. स्मशानभूमी शेजारी राहत असलेल्या या कुटुंबातील नऊ वर्षाचा मुलगा आयान हा गुरुवारी संध्याकाळच्या वेळी घरासमोरील रस्त्यावर शौचास बसला होता. ते कृत्य पाहून राजू सट्टा याने रागाने शेख कुटुंबाला शिवीगाळ केली व स्वच्छता राखता येत नाही का? असा सवाल केला. त्यावरून बाचाबाची वाढत गेली.
रागावलेल्या राजू सट्टा याने घरात जाऊन कुऱ्हाड आणली आणि शेख यांच्या घरात घुसून दोघा पती पत्नीला कुऱ्हाडी ने मारले. याच घटनेत अंजली शेख हिच्या हातात असलेल्या नऊ महिन्याच्या मुलावरही कुऱ्हाडीने वार केला. या घटनेनंतर राजू सट्टा पळून गेला. पोलिसांनी या तिघांनाही नेरूळ मधील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.











