पुणे : महान्यूज लाईव्ह
घटना पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. शेजारी राहणाऱ्या साठ वर्षाच्या आजोबाने चॉकलेट खायला देण्याच्या आमिषाखाली वेळोवेळी घरी नेऊन दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघडकीस आली आणि पुण्यात खळबळ उडाली.
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 60 वर्षीय या व्यक्तीने घराबाहेर खेळणाऱ्या दोन मुलींना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवले. चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले व त्यांच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
दोन दिवसांपूर्वी ही घटना मुलींनी त्यांच्या आईला सांगितली आणि घाबरलेल्या आईने थेट मुंढवा पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देत या नराधमाला अटक केली.











