• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाई विधानसभा मतदारसंघात शांततेत ६७.५८ टक्के मतदान!

tdadmin by tdadmin
November 21, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, Featured
0
वाई विधानसभा मतदारसंघात शांततेत ६७.५८ टक्के मतदान!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

Daulatrao Pisal : Mahanews Live

वाई- खंडाळा- महाबळेश्‍वर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी आज ६७.५८ टक्के मतदान झाले. दुर्गम कांदाटी खोर्‍यात निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.

रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम व व्ही. व्ही. पॅट मशीन घेऊन पोलीस बंदोबस्तात वाई मध्ये आणली जात होती. काल सकाळपासून मतदार संघातील ४७१ मतदान केंद्रावर ३६८७ कर्मचार्‍यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरू झाली. ग्रामीण भागासह शहरातील बहुतेक केंद्रांवर 6 ची वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. सकाळी 11 वाजेपर्यंत मतदारांचा ओघ मतदान केंद्रावर दिसत होता.

अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी 1 वाजेपर्यंत ३४. ४२ टक्के मतदान झाले होते. दुपारी 3 पर्यंत मतदारांचा ओघ कमी झाला होता. ३ वाजेपर्यंत ४८.१९ टक्के मतदान झाले. दुपारी 4 नंतर मात्र पुन्हा मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जेष्ठ नागरिकांसह दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र वाहन व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

दुर्गम कांदाटी खोर्‍यातील सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर आज निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पडली. याठिकाणची वायरलेस व जीपीएस यंत्रणा सुरळीत असल्याने मतदान प्रक्रियेची माहिती सहजपणे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उपलब्ध होत होती.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.५५ टक्के मतदान झाले. एकुण ६४ हजार ३९३ मतदारांनी मतदान केले.

दुपारी १ वाजेपर्यंत ३४. ४२ टक्के मतदान झाले. एकुण १ लाख १९ हजार ४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.१९ टक्के मतदान झाले. एकुण १ लाख ६७ हजार २५४ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.२९ टक्के मतदान झाले. यावेळी २ लाख १२ हजार ७४० मतदारांनी मतदान केले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रात उपस्थित होते. त्यांचे मतदान उशीरापर्यंत सुरू असल्याने नक्की आकडेवारी समजू शकली नाही, तरी ६७.५८ टक्के मतदान झाले झाले आहे.
    

वृध्द, दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्या आणण्याची सोय करण्यात आली होती. अनेक वृध्दांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वाई तालुक्यात मतदान केंद्रांना आमदार मकरंद पाटील, अरुणादेवी पिसाळ यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच इतर उमेदवारांनीही भेटी दिल्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकामी निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा वाईचे तहसिलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्‍वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील, खंडाळाचे तहसिलदार अजित पाटील व निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या सर्वच सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

डीवायएसपी बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन्ही तालुक्यांमध्ये मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, वाईचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बिपीन चव्हाण यांनी वाई शहर व तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

Next Post
दौंड विधानसभा मतदारसंघात ७२.२६ टक्के मतदान! वाढलेली मतांची टक्केवारी कोणाचा कार्यक्रम करणार?

दौंड विधानसभा मतदारसंघात ७२.२६ टक्के मतदान! वाढलेली मतांची टक्केवारी कोणाचा कार्यक्रम करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group